
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) शिर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील “बी. द चेंज फाउंडेशन” यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी (सन २०२५) चा न्यायडोंगरी तालुका नांदगाव येथील श्री शनेश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित स्वर्गीय गंगाधर (अण्णासो) शिवराम आहेर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे प्राथमिक शिक्षक पंढरीनाथ गोविंद राठोड यांना प्रदान करण्यात आला. त्यात प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, व श्री विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देऊन गौरविन्यात आले या संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महासंघ (समता ग्रुप) कोपरगाव चे चेअरमन मा. ओमप्रकाश दादाप्पा (काका ) कोयटे. यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .तसेच न्यायडोंगरी येथील आपल्या संस्थेचे प्राथमिक शिक्षक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्वेसर्वा ॲड अनिल दादा आहेर यांनीही राठोड यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करून त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

ॲड अनिल दादा आहेर आदर्श शिक्षक राठोड यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करून त्यांचे अभिनंदन केले यावेळी संस्थेचे सर्व उपस्थित शिक्षक व कर्मचारी
