
नायडोंगरी (प्रतिनिधी) येथील कै. लोकनेते विजय मामा आहेर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन पदी “संजय सरगर ” यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली रोटेशन पद्धतीने रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली असून सोसायटीचे कार्यालयात विद्यमान चेअरमन ॲड अनिल दादा आहेर व सर्व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेमध्ये सरगर यांची निवड घोषित करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल ज्येष्ठ पत्रकार जगन पाटील यांच्या हस्ते संजय सरगर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व व्हाईस चेअरमन पदाच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सोसायटीचे चेअरमन अनिल दादा आहेर संचालक श्रीरंग कुलकर्णी, डॉ. शरद आहेर, डॉ. विष्णू पाटील, रामचंद्र आहेर, रमेश देवरे, अकलाक शेख, मधुकर आहेर, रंजन आहेर ,व संस्थेचे सचिव विलास चव्हाण आदी उपस्थित होते. सोबत:- फोटो नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन संजय सरगर यांचा सत्कार करताना ज्येष्ठ पत्रकार जगन पाटील व सर्व संचालक मंडळ.
