
सोनांबे (प्रतिनिधी) सोनांबे जनता विद्यालयात लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे.विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच लोकशाही शासन व्यवस्थेचा परिचय व्हावा म्हणून तालुका संचालक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली.अर्ज भरणे,माघार घेणे,छाननी,चिन्ह वाटप ,मतदान व मतमोजणी अशा सर्व प्रक्रिया यावेळी राबविण्यात आल्या.देशात द्रौपदी मुर्मु यांच्या रूपाने महिला राष्ट्रपती पदी असल्याने विद्यालयाने तोच कित्ता गिरवत ज्येष्ठ शिक्षिका ज्योती पाटील यांची विद्यालयाच्या राष्ट्रपती पदी एकमताने निवड केली.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.मत पत्रिकेचा वापर करून पार पडलेल्या निवडणुकीत प्रणाली पवार शालेय पंतप्रधान,सलोनी साव उपपंतप्रधान,गौरी पवार शिस्त मंत्री,साक्षी जाधव उप शिस्त मंत्री ,आयुष डावरे अभ्यास मंत्री, साहिल शिंदे आरोग्यमंत्री,अर्चित पवार क्रीडा मंत्री, सानवी शिंदे सांस्कृतिक मंत्री,पुष्पा बांगर परिपाठ मंत्री,सार्थक शिंदे सहल मंत्री याप्रमाणे मंत्र्यांची निवड करण्यात आली.राष्ट्रपती ज्योती पाटील यांनी सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.ज्येष्ठ शिक्षक पंडितराव चीने यांनी निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहिले.पर्यवेक्षक दिगंबर जाधव,सोपान पवार,दीपक भालेराव,रुपावली काळे,रुपाली महाले,भाऊसाहेब दहिफळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले
