
वाडगाव :महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामीण कृषी कार्यानुभव अभियानाअंतर्गत महाविद्यालयाचे कृषीदूत यांनी वाडगाव गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून तेथील शेतकरी व ग्रामस्थ यांना कृषी दिना विषयीं माहिती दिली के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थि कृषीदूत नलावडे साहिल, मानस नांदुरकर, पुष्पेंद्र नायक, साहिल पाबळे, आदेश परदेशी, सर्वेश शिंदे, आदित्य बनकर, यांनी सहभाग घेतला कृषि दिन हा कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. त्यामुळे कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे. कृषी दिन १ जुलै रोजी हरितक्रांतीचेे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त शासन स्तरावर साजरा केला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो.पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जवाबदारी या पृथ्वी वरच्या प्रत्येक व्यक्ति ची आहे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी जर सकारात्मक पाऊल उचलले तर नक्कीच भविष्यात आपल्याला बदल पाहायला मिळेल असे मत कृषी दुतांनी मांडले सरपंच सुनील निंबेकर, आरोग्य सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते
