
नाशिकरोड:- (प्रतिनिधी) पळसे येथील नासाका माध्यमिक विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील ‘मोरया जॉगर्स क्लब’ने दातृत्वाचा वसा जपला. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमात मोरया जॉगर्स क्लबचे अध्यक्ष कवी भगवान पाटील, संदीप घोडे, राजाभाऊ गोरिवले, सतीश विशे, सुनील उदमले, बबनराव ढगे आणि सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्कूलशूज, स्कूलबॅग, कंपास आणि वह्या भेट दिल्या. उपक्रमासाठी बाबूलाल चौधरी, शंभूशेठ लव्हाटे, हेमंत कराड, सचिन सांगळे, बबनराव ढगे आदींनी वाढदिवसानिमित्त योगदान दिले. पर्यावरणप्रेमी बबनराव ढगे यांच्या संकल्पनेतून विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष भगवान पाटील आणि बबनराव ढगे यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा असल्याचे सांगत ज्ञानाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा वसा जपण्याचे आवाहन केले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले.फोटोओळी:- नासाका विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना मोरया जॉगर्स क्लबचे अध्यक्ष भगवान पाटील, संदीप घोडे, राजाभाऊ गोरिवले, सतीश विशे, सुनील उदमले, बबनराव ढगे आणि पदाधिकारी. समवेत शिक्षक-कर्मचारी.
