
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९५६ वा दिवस
माझ्या कार्याचे मोल होवो अथवा न होवो, मी या युवकांचे संघटन करण्यासाठीच जन्म घेतला आहे. जे अत्यंत दीन, हीन आहेत, त्यांच्या दारोदारी सुख, नीती, धर्म व शिक्षण हे सर्व घेऊन युवक जातील हीच माझी आकांक्षा आहे. हेच माझे व्रत आहे. एक तर मी व्रत पार पाडीन, नाहीतर मृत्यू पत्कारीन. राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी अखेरच्या श्वासापर्यंत सतत काम करत रहा, मी सदैव तुमच्या सोबत आहे आणि जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझा आत्मा निरंतर तुम्हाला प्रेरणा देत राहील. राष्ट्रनिर्मितीसाठी मरण येणे लाख पटीने श्रेष्ठ आहे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १३ आषाढ शके १९४७
★ आषाढ शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ४ जुलै २०२५
★ कांदे नवमी
★ १७२९ मराठा आरमारचे प्रमुख “सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतीदिन
★ १९०२ भारतीय तत्वज्ञानाचा जगभरात प्रचार, प्रसार करुन विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे महान तत्वज्ञ, स्वामी विवेकानंद यांचा स्मृतीदिन.
★ १९६३ भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा स्मृतीदिन.
★ स्वामीजी तुम्ही प्रज्वलीत केलेली विश्व अभ्युदयाची मशाल आज आमच्या हातात आहे. विवेकानंद विचारदूत म्हणून आपले विचार जनमानसांपर्यंत अखंडितपणे पोहचत आहोत. या कार्याचे पायिक म्हणून तुम्ही आमची निवड केली म्हणून आम्ही कृतज्ञ आहोत आणि कृतार्थही. वीर संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र स्मृतिस कोटी कोटी प्रणाम.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
