
मनोली (प्रतिनिधी) मनोली, 1 जुलै – के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी प्रज्वल साठे, सुमित पटारे, प्रतीक शिंदे, तन्मय शिंदे, तेजेस सोनवणे, शेखर टाके यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि औद्योगिकता तंत्रज्ञानाचा वापर अशा विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद सरपंच मा. ज्ञानेश्वर गवे यांनी भुषावले तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका,शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थी, शेतकरी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्हा परिषद शाळा मनोली च्या प्रांगणात व टेकडी च्या सभोवताली गावकऱ्यांच्या व कृषीदूतांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पआहाराचे वाटप करण्यात आले. या दरम्यान गावकरी विद्यार्थी व कृषीदूत यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण होते.या कार्यक्रमाला के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. हाडोळे, प्रा. परमेश्वरी पवार व कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती मोटे, प्रा. दीपक पाटील, डॉ. माधवी सोनोने आदी यांचे मार्गदर्शन लाभले.
