
.ओझर (वार्ताहर) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात हरित सेने अंतर्गत सालाबादाप्रमाणे आषाढीवारी निमित्त जेसीआय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा दामिनी देशमानकर सेक्रेटरी तुषार पगार, सीनियर अधिकारी बी पी चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. व्यासपीठावर सदस्य नितीन देशमानकर संतोष सोनवणे चैतन्य देशमानकर नितीन हिंगोणेकर योगेश मोरे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे दशरथ शिंदे आत्माराम शिंदे प्रभाकर लवांड बाळासाहेब मोरे मधुकर डांगले नरेंद्र डेरले पुंडलिक जाधव आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी दामिनी देशमानकर यांनी विद्यालयास झाडे, शेणखत, खड्डे खोदकामासाठी जेसीबी, गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
