मुंगसारे (ता. नाशिक) – १ जुलै २०२५मुंगसारे गावात हरित क्रांतीचे जनक मा. वसंतराव नाईक यांच्या जन्म जयंती आणि कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पर्यावरणाचे संवर्धन, हरित महाराष्ट्राच्या दिशेने पुढे जाणे आणि भावी पिढीसाठी शुद्ध हवा निर्माण व्हावी या उद्देशाने गावात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.या उपक्रमात साग, आवळा, करंज, अशोक, बदाम यांसारख्या उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली.कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, महिला बचत गट, ग्रामस्थ व युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे आयोजन के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक येथील अंतिम वर्षाचे विद्यार्थी मयुर रायसिंग, महेशकुमार पाटील, अंगत पाटील, अविष्कार संधान, ओमकार संधान, आदित्य राजपूत आणि पियुष पवार यांनी केले होते. त्यांचा पुढाकार आणि समन्वयामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमात मान्यवर सरपंच मा. रामदास उगले, ग्रामसेवक प्रवीण भवरे, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब म्हैसधुने, सखाराम धोंडगे, साई म्हैसधुने तसेच गावातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्षांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.वसंतराव नाईक यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत गावात राबवलेला हा वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरले.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा.के.एस.बंदी, संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चेंट, चांगदेवराव होळकर, विश्वस्त व प्राचार्य डॉ. के.एन. नांदुरकर, डॉ.एस.एस.साने, शकुंतलाताई वाघ, डॉ.व्ही.एस. माने, एस.जी ठाकरे, डॉ.प्रीती भामरे, व कॅम्पस समन्वयक डॉ.व्ही.एम.सेवलीकर, प्राचार्य डॉ.एस.एस.हाडोळे, प्रा. तुषार उगले, प्रा.परमेश्वरी पवार, प्रा.दीपक पाटील, प्रा.ज्योती मोटे, प्रा.सोनोणे यांचे मार्गदर्शन लाभले.
