
ओझर: ( वार्ताहर.) प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर अंतर्गत उपकेंद्र 1येथे आज मिशन वात्सल्य योजनेमधून गाडेकरवाडी, कोळीवाडा, मधला माळीवाडा समतानगर तानाजी चौक अत्तारगल्ली करपेगल्ली आदिवासी वस्ती मधील महिलाना गर्भधारणेपूर्वी तपासणी, आरोग्य माहिती त्यात 35 महिलांची रक्त चाचणी करून त्यातील हिमोग्लोबीन प्रमाण सिकल सेल, एचआय व्हि थायरॉईड, HbsAg 1, कॅल्शियम, CBC, युरिक ऍसिड, BdHcg, वजनउंची बीएमआय काढून भविष्यात होणाऱ्या गर्भधारणा प्रसुतीपूर्व व प्रसूती पश्चात होणारे धोके टाळण्यासाठी वात्सल्य अंतर्गत शिबीर घेण्यात आले. त्यात उपकेंद्राच्या सिस्टर ससाणे योगिता, दीपिका भामरे, बागुल मनिषा, आशा गटप्रवर्तक कावेरी कदम, आरोग्य सेवक प्रवीण राऊत, सतीश गारोळे, वैशाली जाधव यांनी उत्कृष्ट वात्सल्य रांगोळी काढली. योगिता जाधव, भारती लीलके, रोहिणी धामट, वृषाली तिवारी, सुगंधा राजगुरू, स्वाती पवार, रोहिणी कदम, एचएलएल लॅबचे प्रशिक्षक बागुल समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा जुनागडे, आरोग्य सुपरवायजर रविंद देवरे, आरोग्य सहायक अनिल राठी, वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे, डॉ प्राची पवार यांचे वात्सल्य कार्यक्रमास मार्गदर्शन लाभले.
