
नाशिक (प्रतिनिधी). स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित, श्रीमान टी जे चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय ,मोरवाडी सिडको या शाळेत 4 जुलै म्हणजे स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून इयत्ता पाचवीच्या वर्गांची वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुरुवातीला वर्ग वर्गात स्पर्धा घेण्यात आली व यातून फक्त अंतिम फेरीसाठी आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या आठ विद्यार्थ्यांनी मान्यवर परीक्षकांसमोर आपले वकृत्व कला ही सादर केली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री पानपाटील सर यांनी कामकाज पाहिले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु.हिमांशू वाघ या विद्यार्थ्याला मिळाले. द्वितीय क्रमांक कु.गौरी अनिल महाजन, तृतीय क्रमांक पूर्वा गामणे तर तसेच उत्तेजनार्थ बक्षीस कु अथर्व शेळके या विद्यार्थ्यांना मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका, मान्यवर परीक्षक यांच्यातर्फे गौरविण्यात आले.सदर स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय दळे मॅडम ,पर्यवेक्षक श्री गहानकरी सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आव्हाड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सुरसे मॅडम यांनी केले.
