
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९५५ वा दिवस
इतिहासाकडे ज्यांची नोंद नाही, परंपराच्या गहन अंधारात डोकावू सुद्धा धजत नाही. अशा काळापासून ही मातृभूमी एकामागून एक शुभ्र विचारांचे प्रेषण करीत आहेत. यज्ञवेदींच्या विटांची रचना करता करता या अदम्य प्रतिभेला भूमितीची प्रमेये स्फुरली. पूजा आणि आहुतींचे मुहूर्त निश्चित करण्यासाठी नक्षत्रांचा अभ्यास करता करता जगाला चकित करतील असे नक्षत्रज्ञानाचे शोध त्यांनी लावले. त्यांच्या सर्वगामी प्रज्ञाने अन्य कोणत्याही प्राचीन व आधुनिक वंशाने दिली नव्हती एवढी मोठी गणित शास्त्राची व बीज गणिताची देणगी भारताने जगाला दिली आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १२ आषाढ शके १९४७
★ आषाढ शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ३ जुलै २०२५
★ १८५० ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रमुखाने भारतातून आणलेला “कोहिनूर” हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
★ १९९६ हिंदी चित्रपट अभिनेते, आपल्या जबरदस्त आवाजाने संवाद साधणारे डायलॉग किंग कुलभूषण पंडित उर्फ राजकुमार यांचा स्मृतीदिन.
