
मोरेवाडी ( प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित, श्रीमान टी.जे. चौहान माध्यमिक विद्यालय ,मोरवाडी येथे सन २०२५- २६या शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये खालील प्रमाणे मंत्र्यांची निवड झाली. **पंतप्रधान–कु. समीक्षा तानाजी चुंबळे.पंतप्रधान — कु. देव दिनेश चौधरी.उपपंतप्रधान– कु. भाग्यश्री मनोहर मोरे.उपपंतप्रधान–कु. आदित्य संदीप पाटील सांस्कृतिक मंत्री – – आर्या संतोष पास्ते शिस्त मंत्री – – वैजनाथ राजकुमार चोले..** या निवडणुकी द्वारे लोकशाहीचा आदर्श वस्तूपाठ विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रत्यक्ष मतदानातून अतिशय पारदर्शकपणे निवडणूक घेण्यात आली . निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीकांत सुरसे,अनुराधा काकडे व प्रिया शेवाळे यांनी काम पाहिले सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी व पर्यवेक्षक कीर्तिकुमार गहाणकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
