
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव शहरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील 10 वी 12 वीच्या विद्यार्थीनीना वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्यासाठी नालंदा नर्सिंग व पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था सर्वपरीने मदत करेल आपल्या पाल्यानी मुलीच्या करीयर संदर्भात एकदा भेट द्यावी असे स्पष्ट मत शहरातील प्रसिद्ध डॉ सुनील तुसे यांनी व्यक्त केले नालंदा नर्सिंग आणि पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मंचावर डॉ शशांक तुसे,डॉ यश कासलीवाल, ऋषीकेश दायमा,ऍड अभिलाषा दायमा,शिवकण्या सौ संगिता सोनवणे, सरिता कुलकर्णी, भाग्यश्री खैरणार, वैभव रौदाळे, साक्षी खैरणार, स्वाती खैरणार, पूनम खोडे, संस्थेचे संचालक सागर आहेर आदि उपस्थित होते. नांदगाव शहरातील तसेच तालुक्यातील तरुणींना मेडिकल क्षेत्रात करीयर करण्यासाठी नालंदा नर्सिंग आणि पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्थेची महत्वाची भूमिका आहे या संस्थेच्या विद्यार्थीनीच्या स्वागत कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या संस्थेत सरकारी कोर्स सुविधा उपलब्ध असुन मुलींनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
