
नैताळे. (प्रतिनिधी ) दि. ०२ जुलै २०२५ बुधवार**मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक* संचलित *जनता विद्यालय नैताळे येथे मविप्र निफाड तालुका संचालक माननीय श्री.शिवाजी जयराम पाटील गडाख साहेब यांनी आज रोजी विद्यालयाला भेट दिली असता प्रत्यक्ष इयत्ता ८ वी ९ वी आणि १० वी च्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी हितगुज करून गणित व इंग्रजी विषयांच्या प्रगतीचा आढावा घेतला.याचबरोबर खेळाविषयी माहिती जाणून घेतली आणि विद्यालयाच्या मैदानाबद्दल सखोल चर्चा केली.वर्गामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यात उपयुक्त असे मार्गदर्शन केले.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती सानप मॅडम यांच्याकडे शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले व शिक्षकांना उपयुक्त असे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले.
