
शिवाजी हांडोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्र माझा’ परिवाराच्या वतीने पळसे येथील नासाका आदर्श प्राथमिक विद्यामंदिरच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करताना मान्यवर.
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )येथील शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे माजी अध्यक्ष आणि विहितगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी हांडोरे यांचा वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करत विधायक उपक्रमाने साजरा करण्यात आला. पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील आदर्श प्राथमिक विद्यामंदिरच्या गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग आणि वह्यांचे वाटप हांडोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्र माझा’ परिवाराच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास (बंटी) भागवत, पळसे येथील ग्रामाभिमान मंचचे अध्यक्ष प्रमोद गायधनी, शिवजन्मोत्सव समितीचे माजी कार्याध्यक्ष मनोज ठाकरे, माजी सरचिटणीस संदीप वाळके, विहितगावच्या प्रतिपंढरपूर देवस्थानचे दिनेश हांडोरे, अमर जमधडे, ओम हांडोरे, ओम शिंदे, प्रणव गुरुळे, मुख्याध्यापक चंद्रकांत खाणकरी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक कैलास लहांगे मंचावर उपस्थित होते. शिवाजी हांडोरे यांचा वाढदिवस फळांचा केक कापून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पाहुण्यांनी भाषणात या विधायक उपक्रमाचे स्वागत करून गरजूंच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी समाजातील दानशुरांनी मदत करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक चंद्रकांत खाणकरी यांच्यासह शिक्षिका शांता सानप, योगिता पाटोळे, शोभा काळे, माणिक भरसट, जयश्री आगळे, वर्षा सानप यांनी स्वागत केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
