
यशवंतनगर (प्रतिनिधी) यशवंतनगर, १ जुलै – के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी आदेश तांबे, साहिल तांबोळी, गौरव वाघ ,प्रणव टेकवडे, सिद्धांत येवले, अवधूत वायाळ व सुमेध इंगळे यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिकता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा, यशवंतनगर येथे कृषी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले.कार्यक्रमाची सुरुवात ‘शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या’ भाषणांनी झाली. कृषीदुतांनी सेंद्रिय शेती, माती विना शेती, व नवीन तंत्रज्ञानाचा वापर अशा विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद सरपंच मा. अगस्ती फडोल यांनी भुषावले तसेच ग्रामस्थ, शाळकरी मुले आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. हाडोळे, प्रा. परमेश्वरी पवार व कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती मोटे, प्रा. दीपक पाटील, डॉ. माधवी सोनोने आदी यांचे मार्गदर्शन लाभले.
