
सावरगाव ता निफाड (वार्ताहर श्री जगदीश कुशारे) नांदुर्डी तालुका निफाड येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित अभिनव बालविकास मंदिर नांदुर्डी येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षाचा पालक मेळावा अतिशय उत्साह वातावरणात पार पडला. अभिनव चे मुख्याध्यापक श्री शिंदे व्ही यू यांनी सदर पालक मेळाव्याचे आयोजन केले या पालक मेळावा साठी माध्यमिक चे मुख्याध्यापक आदरणीय श्री भाऊसाहेब म्हसकर सर पर्यवेक्षक श्रीमती रणशुर मॅडम, अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सिताराम पाटील, माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बोराडे तात्या उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय एकनाथ पाटील निकम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील वाकडे तसेच पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय पालक वर्ग या मेळाव्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हसकर सर यांनी केले शालेय शिस्त याबद्दल घोडेकर मॅडम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले मुख्याध्यापक शिंदे सर यांनी शालेय बस शिस्त व गुणवत्ता याबद्दल सविस्तर चर्चा पालकांशी केली एक चर्चात्मक स्वरूपात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गुरगुडे मॅडम यांनी केले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पालक मेळाव्यात सहभाग घेतला
