
आसरखेडे(प्रतिनिधी )जनता विद्यालय आसरखेडे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेचे पुजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सी. आर. कापडनीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान या विषयावर ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्राचे नियोजन इ. ९वी च्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जिवनावर आधारित शिक्षकांची भाषणे झाली. व अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती सी आर कापडनीस यांनी कृषी चे महत्त्व व कृषीसप्ताह ची माहिती सांगितली व कार्यक्रमाच्या नियोजना बद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करन्यात आला.
