
नाशिक [ प्रतिनिधी ] मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या संयुक्त विद्देमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बहुचर्चित मानाच्या बहुमानांकित सर्वत्र चर्चेत असलेला यंदाच्या सत्तर जीवन गौरव पुरस्कारांमध्ये मानकरी ठरले बागलाण तालुक्यातील सटाणा येथील रहिवासी अनेक वर्ष नगर पालिकेच्या अनेक पदांवर कार्यरत राहिलेले, शेती माती आणि राजकारणात सक्रिय आघाडीवर असलेले स्पष्ट निर्भिड व्यक्तिमत्व, जीवास जीव देणारे उबाटा सेनेचे बागलाण तालुका प्रमुख बागलाणची मुलुखमैदानी तोफ अरविंदजी सोनवणे उर्फ साहेब यांना रविवार दिनांक २९ / ०६ / २०२५ रोजी नाशिकच्या कर्मभूमीत द पवार गार्डन येथे मा. डॉ. शेफालीताई भूजबळ चिफ ॲडमिस्ट्रेटर भूजबळ कॉलेज नाशिक, मा. श्री सुनिल पवार पोलिस निरिक्षक क्राईम पंचवटी पो. स्टे. , मा. श्री एम. आर. डावरे डायरेक्टर लायन्स क्लब ऑफ नाशिक शहर , मा. डॉ. विठ्ठलसिंग ढाकरे . प्राध्यापक हिंदी विभाग अध्यक्ष, मा. महंत श्री डॉ. भक्ति चरणदासजी महाराज अ. भा. आखाडा परिषद राष्ट्रीय प्रवक्ते यांचे हस्ते व संस्थेच्या संस्थापिका सौ. मेघा शिंपी, कार्याध्यक्ष श्रीमती मंजुताई जाखाडी, मा. डॉ. अनिल नहार अध्यक्ष महावीर इंटर नॅशनल यांच्या उपस्थितीत, शेकडो साहित्यिकांच्या टाळ्यांच्या गजरात जीवन गौरव पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले. अरविंदजी सोनवणे साहेबांना या आधीही अनेक मानाच्या संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. साहेबांचा गौरव हा त्यांच्या कार्याचा गौरव समाजाचा गौरव आहे. अशा प्रतिक्रिया राजकीय सामाजिक साहित्य क्षेत्रात उमटत आहेत. विशेष म्हणजे वयाच्या एकसष्टीत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रातून सर्वत्रआनंद व्यक्त होत आहे. त्यांचे गावकुसाचे मित्रवर्य गावगाडाकार साहेबराव नंदन तात्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
