
विंचूर (प्रतिनिधी) विठ्ठल विठ्ठल जय हरी असा विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना येथील जय बजरंग मंडळ व विंचूरकर ग्रामस्थांच्या वतीने मोफत पुरी भाजीचे वाटप करण्यात येत आहे.दिंडी मार्गावरील बरड, नातेपुते, माळशिरस,वेळापूर,भेंडी शेवगाव, वाखरी आदी ठिकाणी दररोज सकाळी सहा ते दुपारी बारा वाजे पर्यंत मोफत पुरी भाजीचे वाटप करण्यात येत आहे.

५८ तेल डबे, ४० कट्टे गहू आटा व ३५ कट्टे बटाटे आदी शिधा घेऊन सुमारे सत्तर ते ऐंशी महिला व पुरुष स्वयंसेवक वाजत गाजत पंढरपूर कडे रवाना झाले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते देविसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या सदर उपक्रमाचे १९ वे वर्षे असून उत्तरोत्तर प्रतिसाद वाढत आहे.पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या स्वयंसेवकांच्या वाहनांचे बोकडदरे येथील भारत माता आश्रमाचे स्वामी जनेश्वरानंद यांच्या हस्ते पूजन करून स्वयंसेवकांना निरोप देण्यात आला.

यावेळी देविसिंग परदेशी,आनंदा नागमोते,भास्कर परदेशी, माधव शिरसाट,जीवन दिवटे,गोविंद शिरसाट, शिवाजी क्षीरसागर, अल्ताफ शेख, राजेंद्र परदेशी, सोमनाथ दरेकर, राजेंद्र क्षीरसागर,त्र्यंबक विभूते,शंकर शिंदे, कृष्णा सदावर्ते,मदन पवार,किरण नवले,श्रीपाद राऊत, विजय क्षीरसागर, रत्नाकर घटे, दत्तात्रय कोळपकर, इस्माईल मोमीन, संदीप शिरसाट, प्रदीप सोनवणे, कृष्णा राऊत, दत्तात्रय व्यवहारे, रविंद्र परदेशी, त्र्यंबक सोनवणे,राजेंद्र जंगम, विष्णु विभूते, रविंद्र परदेशी, बाळासाहेब क्षीरसागर, विलास चौधरी, सुनिल क्षीरसागर, बजरंग परदेशी,भाऊसाहेब गुरसळ, हरीओम परदेशी, ईश्वर नवले, सिद्धेश बोरसे, हिराबाई व्यवहारे, चंद्रभागा शिरसाट,अनुसया सुर्यवंशी,लताबाई शिरसाट, लताबाई धारराव,शशिकला परदेशी, हेमलता परदेशी, कुसुम जंगम,मंगल विभूते, सविता क्षीरसागर,वर्षा चौधरी, रोहिणी व्यवहारे, शितल व्यवहारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोबत छायाचित्र ::- वारकऱ्यांना मोफत अल्पोपहार वाटप करताना बजरंग मंडळाचे कार्यकर्ते विंचूर (निफाड)
