
नाशिक रोड (प्रतिनिधी ) दि.1 जुलै 2025, वार मंगळवार रोजी श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालयात कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याला समर्पित अशा कवितांचे वाचन केले. त्यामध्ये तुकारामांचा शेतकरी, माझा बाप शेतकरी, पोशिंदा व शेतकरी राजा अशा कवितांचा समावेश होता तसेच शेतीची आधुनिक व पारंपारिक अवजारे यांची माहिती देणारे पोस्टर्स तयार करण्यात आले होते. राष्ट्रीय हरित सेनेचे शालेय सदस्य श्री. गावित डी.एस. यांनी कृषी दिनाची माहिती सांगितली. प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.सौ.उज्वला माळी मॅडम, पर्यवेक्षक श्री. गहाणकरी सर तसेच राष्ट्रीय हरित सेनेचे शालेय सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
