
नांदगाव (प्रतिनिधी) – शहरातील जोड पुलालगत असलेल्या कोल्हया नाल्यावर हनुमान नगर ला जोडणार [ गिरणा नगर ] । एक जुना पूल असून तो सध्या अत्यंत जर्जर स्थितीत आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचून हनुमान नगर परिसरात पूरस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी जुन्या पुलाची नव्याने उंच बांधणी करण्यात यावी, तसेच नाल्याचे खोलीकरण करून पाण्याचा मुक्त प्रवाह सुरू ठेवावा, अशी जोरदार मागणी केली आहे.हनुमान नगर, लक्ष्मी नगर सावता नगर मंमादेवी परिसर व आसपासच्या वस्त्यांमध्ये पावसाच्या काळात नाल्यातून वाहणारे पाणी ओसंडून रस्त्यावर व घरांमध्ये शिरते. विशेषतः जुन्या पुलाची उंची अपुरी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडतो आणि त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती उद्भवते. नागरिकांचे आर्थिक नुकसान आणि संसर्गजन्य आजारांचा धोका यामुळे वाढत आहे.या परिसराला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि लहान मोठ्या वाहनांचे या जुन्या पुलावरून वाहतूक होत असते वापरही होत आहे मोठ्या प्रमाणात आणि पूल जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होते मी येथे नव्याने फुल उभारण्याची गरज आहे. यासाठी विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.स्थानिकांनी . ग्रामपंचायत, नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. याबाबत हनुमान नगरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने एक निवेदन प्रशासनाला सादर करण्या चा प्रयत्न होत आहे.मागण्या पुढीलप्रमाणे:जुन्या पुलाची नव्याने उंच व भक्कम बांधणी करावी.नाल्याचे आराखडा तयार करून योग्य खुलीकरण करावे.हनुमान नगर परिसरात साचणारे पाणी तात्काळ नाल्यात वाहून जाईल, अशी यंत्रणा उभी करावी.स्थानिक नागरिकांच्या मते, योग्य नियोजन आणि तातडीने उपाययोजना केल्यास दरवर्षीच्या पूरस्थितीपासून या परिसराला कायमचा दिलासा मिळू शकतो.दरम्यान हनुमान नगरला जोडणाऱ्या जुना पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात घानचा कचरा फेकला जातो पुलाची बांधकामा सोबत या नाल्याचं खोलीकरण जर केलं तर यातील साचणारा पाणी या प्रवाहात वाहून जाईल आणि येथे घाण कचरा करण्यावरती बंदी घालावी अशी मागणी देखील होत आहे परिसरात काही अतिक्रमणधारक आहेत त्याचे क्रमांक धारक या ठिकाणी घनकचरा करत असतात त्यांना वार्निंग देखील देण्यात यावी
