
नांदगांव : ( जेष्ठ पत्रकार मारुती जगधने) मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक यांचा संयुक्त विद्देमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बहुचर्चित मानाचा । बहुमानांकित सर्वत्र चर्चेत असलेला यंदाचा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले

नांदगावचे रहिवासी सध्या योग कार्यासाठी वाहून घेतलेले या निमित्ताने नाशिक येथे स्थाईक असलेले विश्वविक्रम बाळासाहेब मोकळ यांना रविवार दिनांक २९ / ०६ / २०२५ रोजी नाशिकच्या कर्मभूमीत द पवार गार्डन येथे मा. डॉ. शेफालीताई भूजबळ चिफ ॲडमिस्ट्रेटर भूजबळ कॉलेज नाशिक, मा. श्री सुनिल पवार पालिस निरिक्षक क्राईम पंचवटी पो. स्टे. , मा. श्री एम. आर. डावरे डायरेक्टर लायन्स क्लब ऑफ नाशिक शहर , मा. डॉ. विठ्ठलसिंग ढाकरे . प्राध्यापक हिंदी विभाग अध्यक्ष, मा. महंत श्री डॉ. भक्ति चरणदासजी महाराज अ. भा. आखाडा परिषद राष्ट्रीय प्रवक्ते यांचे हस्ते व संस्थेच्या संस्थापिका सौ. मेघा शिंपी, कार्याध्यक्ष श्रीमती मंजुताई जाखाडी, मा. डॉ. अनिल नहार अध्यक्ष महावीर इंटर नॅशनल यांच्या उपस्थितीत, टाळ्यांच्या गजरात जीवन गौरव पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.

नंदन तात्यांना या आधीही अनेक मानाच्या संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे वयाच्या 52 व्या वर्षी जीवन गौरव पुरस्कार घेणारे नांदगाव मधुन पहिलेच योगाचार्य असावेत अशा चर्चा पुरस्कार सोहळ्यात रंगत होत्या.
