
नाशिकरोड:- (प्रतिनिधी). पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ या अनोख्या उपक्रमाला पळसे येथील उपक्रमशील ग्रामाभिमान मंचने हातभार लावत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान केले. ग्रामाभिमान मंचचे अध्यक्ष प्रमोद गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या उपक्रमात प्रमुख पाहुणे महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास (बंटी) भागवत यांच्या हस्ते आणि ग्रामाभिमान मंचचे सचिव प्रा.सुनील आगळे, खजिनदार समाधान गायधनी, सदस्य रवींद्र टिळे, राहुल फडोळ, ओमकार गायधनी, सोहम गायधनी यांच्या उपस्थितीत विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पगार, विद्यालय परिवार आणि गरजू विद्यार्थ्यांनी ग्रामाभिमान मंचच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले.फोटोओळी:- नासाका माध्यमिक विद्यालयात ग्रामाभिमान मंचच्या वतीने स्कूलबॅग वाटप करताना विकास भागवत, प्रा.सुनील आगळे, समाधान गायधनी, मुख्याध्यापक अरुण पगार आदी.
