
नांदगाव (प्रतिनिधी) आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बदामी यांना महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण देण्याबाबतचे निवेदनाद्वारे मागणी केली याबाबत सविस्तर वृत्त असे की मतदार संघातील नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण नसल्यामुळे पुतळ्यांची विटंबना होऊन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर पुतळ्यांना पोलीस संरक्षण देण्याचे मागणी निवेदनाद्वारे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केली आहे.


सोमवार ती 30 जून रोजी पहाटे एका मनोरुण महिला द्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या शुभिकरणाचे लाईट जोडण्यात आली असून त्यामुळे स्मारकाची विटंबना व नुकसान झाले आहे यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून धनगर समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे सदर घटनेत महिला वेडसर असल्याने समाजाने सामंजस्याची भूमिका घेतली असली तरी यापुढे असे गैर कृत्य होऊ नये याची काळजी म्हणून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पोलीस संरक्षण मिळावे म्हणून आमदार कांदे यांनी निवेदन दिले आहे याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ किडगे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे चंद्रशेखर कवडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बंडू पाटील युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे त्र्यंबक शेरमाळे राजेश शिंदे शरद आयनोर शुभम शिंदे दीपक बनगर निवृत्ती शिंदे बळवंत शिंदे बापू काळे श्री पारखे डॉ.गणेश चव्हाण विकी सोर भिका खटके चांगु खेमनर,जय तांबे, संतोष सोर महेंद्र गायकवाड तानसेन जगताप खंडु कोळेकर लहानु गोटे सागर मोरे आदी उपस्थित होते.
