
नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव येथील आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2025–2026 च्या प्रारंभी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) तपासणी करण्यात आली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश कर्मचारी वर्गाच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्या सध्याच्या शारीरिक स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.या तपासणीमध्ये एकूण 69 कर्मचारी सहभागी झाले. यामध्ये बी एम आय च्या वर्गवारीनुसार प्रत्येक वर्गवारी मध्ये प्राध्यापक आढळून आलेया उपक्रमामधून 47.8% कर्मचारी सामान्य वजनमानात असल्याचे स्पष्ट झाले,

तर जवळपास 44.9% कर्मचारी वजनवाढ किंवा स्थूलतेच्या श्रेणीत असल्यामुळे जीवनशैलीत सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली.उपक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा. एल. एम. गळदगे यांच्या मार्फत करण्यात आले. प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे व उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला मार्गदर्शन मिळाले. तपासणीदरम्यान श्री. डी. पी. अहिरराव यांनी वजन, उंची घेण्यासाठी सहकार्य केले.या उपक्रमानंतर वर्षाअखेरीस पुन्हा एकदा फॉलो-अप बीएमआय तपासणी घेण्यात येणार असून, आरोग्य सुधारणा झालेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे महाविद्यालयीन कर्मचारी वर्गात आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागली असून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
