
दहयाने (ता. चांदवड) – चांदवड तालुक्यातील दयाने गावात सागर इंडस्ट्रीज कंपनीकडून केमिकलयुक्त विषारी पाणी थेट शेतांमध्ये सोडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचा प्रवाह नाल्याद्वारे सरळ गोंदा ओहोळातून नेत्रावती नदीमार्गे जांभुळटेक धरणापर्यंत पोहोचत असून, त्यामुळे नदीचे पाणी पूर्णपणे काळपट झाले आहे.या विषारी पाण्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी दूषित झाले असून, नागरिकांना त्वचेला खाज, घसा दुखणे, अंग दुखणे यासारख्या त्रासदायक समस्या जाणवू लागल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आणले आहे.कंपनीकडून “सोमवारी पाहतो” अशी टाळाटाळदि. 27 जून रोजी सकाळी काही शेतकऱ्यांनी सागर इंडस्ट्रीज कंपनीकडे तक्रार निवेदन दिले. मात्र कंपनीकडून “सोमवारी पाहतो” असे म्हणत दुर्लक्ष केले गेले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी “आता आमचा न्याय कोण देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.प्रशासनाकडेही तक्रार, पण कृती अद्याप नाहीदहयाने गावच्या ग्रामपंचायत सदस्य रेणुका चौधरी यांनी या गंभीर प्रकाराची माहिती नाशिक जिल्हाध्यक्ष – युवा क्रांती ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेचे श्री. भागवत झाल्टे यांना दिली. त्यानंतर झाल्टे यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदारांनी तातडीने तलाठ्यांना पाहणीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले, मात्र अद्याप प्रभावी कारवाई झाली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.—शेतकऱ्यांची मागणी व इशारा:स्थानिक शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य रेणुका चौधरी, सावळीराम चौधरी, शंकर बडे, ओंकार बढे बाबाजी वासदेव, उल्हास जाधव, शोभा बढे, जिजाबाई वासुदेव आदींनी प्रशासनाकडे सागर इंडस्ट्रीजवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.जर प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर शेतकरी तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.—मुख्य मुद्दे:विषारी पाण्यामुळे नदीचे पाणी काळपटविहिरी, बोअरवेलचे पाणी दूषितनागरिकांना त्वचा व घशाचे त्रासजनावरांच्या आरोग्यावरही परिणामकंपनीकडून टाळ

