
नाशिक (प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय मोरवाडी या विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा मोठ्या थाटात पार पडला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रथितयश पत्रकार श्री. प्रवर देशपांडे, शालेय समिती सदस्य सुरेश डोळसे, ॲड. परमानंद पाटील, देणगीदार बाळकृष्ण पवार ,रमेश वडनेरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी, पर्यवेक्षक कीर्तिकुमार गहाणकरी उपस्थित होते.स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यादेवी शारदा व स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र प्रतिमांचे पूजन पाहुण्यांनी केले. विद्यालयातील गीतमंचाने सुरेल ईशस्तवन सादर केले.पाहुण्यांचा परिचय पुष्कर सोनवणे या विद्यार्थ्याने केला.विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाच्या उज्वल यशाची व गुणवंत विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाची माहिती दिली व १००% निकाल जाहीर करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .प्रमुख पाहुण्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला त्यामध्येप्रथम – गौरी गामनेरामकेश प्रजापती.द्वितीय -देवयानी चव्हाण तृतीय- प्रिया शेळके चतुर्थ – प्रणाली कुवर राजश्री चव्हाण श्रद्धा बोराडे पाचवी – साक्षी शेंडे ईश्वरी सावंतयांचा समावेश होता. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी व व मान्यवरांनी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा आपल्या शुभ हस्ते गौरव केला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांची मनोगते सादर झाली. गौरी गा मणे, रामकेश प्रजापती श्रद्धा बोराडे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपली यशोगाथा आणि शाळेबद्दलचे ऋण व्यक्त केले. कविता चव्हाण, अंतराम प्रजापति या पालकांनी आपले मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.व शाळेबद्दल समाधान व्यक्त केले .प्रमुख पाहुण्यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले व साधना करण्यावर भर दिला त्याचबरोबर संकल्पना समजून अभ्यास निश्चित केल्यास यश नक्की प्राप्त होते तसेच साधना ,समर्पण ,आणि संस्कार या तीन तत्त्वांचा अंगीकार करण्याचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला .मुख्याध्यापिका उज्वला माळी यांनी आपल्या शुभ हस्ते स्वामी विवेकानंदांची छोटीशी प्रतिमा देऊन प्रमुख पाहुण्यांचे व इतर मान्यवरांचे आभार मानले. या सोहळ्याची सांगता अभंगवाणीने झाली. सृष्टी शिंदे, धनश्री हिरे पुष्कर सोनवणे या विद्यार्थ्यांनी अतिशय बहारदार सूत्रसंचालन केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
