
.ओझर: ( वार्ताहर) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात पाचवी ते सातवीच्या होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वहया पुस्तके पेन यांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविकात मंगल सावंत यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक सोपान वाटपाडे पर्यवेक्षक दशरथ शिंदे उज्वला जाधव सीमा पाटील संगीता सोनवणे अनिता शिरोळे राजश्री पिंगळे आदी वर्गशिक्षिका उपस्थित होत्या. या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत होणार असल्याचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका उज्वला जाधव यांनी केले.
