
मखमलाबाद विद्यालयात अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,ज्येष्ठ क्रीडाशिक्षक अनिल पगार,शरद आहेर,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे अमली पदार्थ सेवन विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनापासून होणाऱ्या दुष्परिणामांची सखोल माहिती व्हावी,विद्यार्थ्यांनी या व्यसनांपासून दूर रहावे हा यामागील महत्वाचा हेतू आहे.विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी या दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.अमली पदार्थ म्हणजे ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा किंवा धुंदी येते त्यांना मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात.दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर अमली पदार्थ सेवन विरोधी दिन विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो.युनोने १९८८ साली याची घोषणा केली.२६ जून या दिवसाला चीनमधील पहिल्या अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहेत.तरूणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते.तरुणांच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात महत्वाचे योगदान असते,म्हणून हा तरुण अमली पदार्थ सेवनांच्या आहारी जाऊ नये,त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने हा दिवस जगभर साजरा केला जातो.

जास्तीत जास्त तरुणांनी, विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारत अभियानात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहेत.आपला देश अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी आपण सर्व सहभागी होऊ या.या दिनानिमित्त विद्यार्थांना अमली पदार्थ सेवन विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली.तसेच विविध घोषवाक्य घेऊन विद्यार्थ्याची प्रभातफेरी काढण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ क्रीडाशिक्षक अनिल पगार, शरद आहेर,प्रमोद पगार,प्रकाश अहिरे सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
