
नाशिक (प्रतिनिधी ) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित श्री डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नाशिक मधील उपक्रमशील *मुख्याध्यापिका मा.सौ. जयश्री पेंढारकर मॅडम* यांना इंडियन टॅलेंट ओलंपियाड, मुंबई यांच्याकडून *” बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड 2025* ” प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑलिंपियाडच्या सर्व परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवून त्यांना मार्गदर्शन केले जाते या कार्याबद्दल त्यांचा गौरव होत आहे.

या कार्यात शाळेतील श्री. विष्णू घुगे आणि श्री. घनकुटे सर या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभते.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. प्रकाशजी वैशंपायन साहेब, उपाध्यक्ष मा. श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब, सेक्रेटरी मा. श्री. हेमंत बरकले सर , संस्थेचे सर्व सन्माननीय गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व पदाधिकारी तसेच शाळेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी माननीय मुख्याध्यापिका पेंढारकर मॅडम यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
