
२६ जून हा ज्येष्ठ साहित्यिका व समीक्षक तसेच दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक या संस्थेच्या मार्गदर्शक स्वर्गीय जान्हृवीताई वैशंपायन यांचा जन्मदिन…. दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट ,नासिक या संस्थेच्या वाय.डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ” अक्षरबाग ” या वेगळ्या संकल्पनेतून त्यांना साहित्य अभिवादन करण्यात आले.. त्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी वैशंपायन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

अक्षरबाग या संकल्पनेबद्दल उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी यांनी माहिती दिली.
” अक्षरबाग ” या संकल्पनेत अनेक मान्यवर कवींच्या कवितांनानी बाग सुशोभित करण्यात आली असून यामध्ये कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज , बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ,
कवी मंगेश पाडगावकर , साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी डॉ. सुरेश सावंत , सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड , युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा.ऐश्वर्य पाटेकर , बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी , शाळेची विद्यार्थिनी बालकवयित्री कु.प्रगती धात्रक यांच्या कवितांचा समावेश आहे.

त्याचबरोबर विद्यार्थिनींना अभिव्यक्त होण्याकरीता मुक्तफळा या संकल्पनेतून ” माझा फळा ” या उपक्रमांतर्गत माझी कविता , माझी चित्रकला यासाठीही फळा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी मा.हेमंत बरकले, शाळेच्या अधिक्षिका सौ.मिना वाळुंजे , मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे , डी.डी.बिटकोच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री पेंढारकर , उपमुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोमवंशी , श्री.मिलिंद कोठावदे, पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे, ग.कौ.सदस्य सौ. अमृता कवीश्वर ,सौ.भारती चंद्रात्रे, श्री.दिनेश जाधव , श्री.अनिल ठाकरे , श्री.कैलास बागुल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ.भारती चंद्रात्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
