
मोहाडी (प्रतिनिधी) के आर टी हायस्कूल, मोहाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती अर्थात सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.यावेळी अमली पदार्थ सेवन प्रतिबंध शपथ विद्यार्थ्यांसाह शिक्षकांनी घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यपिका सौ भामरे एस जी मॅडम यांनी भूषवले.त्यांनी आपल्या भाषणातसमतेचा राजा, शोषितांचा तारणहार आणि शिक्षण, आरक्षण, न्याय यांचे प्रणेते म्हणून शाहू महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशा देत आहेत, असे सांगितले. कार्यक्रम इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केला. तसेच कु कस्तुरी जाधव, साई गायकवाड,कु श्रावणी गायकवाड व कु उन्नती जाधव यांनी भाषणे केली.सूत्रसंचलन अथर्व गायकर याने केले. वर्गशिक्षक श्री तुषार गिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कलशिक्षक श्री धनंजय जाधव व श्री कृष्णा जाधव यांनी रेखीव फलकलेखन केले.कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री आर व्ही निकम सर, श्री जाधव पी ई सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
