
अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळखाऊ असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया सुलभ करण्याची गरज आहे. निकालाच्या दीड महिन्यानंतर देखील अकरावीचे प्रवेश पूर्ण झालेले नाही.अनेक टप्पे, अर्ज भरण्याची प्रक्रिया, कागदपत्रे सादर करणे आणि गुणवत्ता याद्यांची वाट पाहणे यांमुळे विद्यार्थ्यांना आणि पाल कांना बराच वेळ ताटकळत रहावे लागत आहे आणि मेहनत लागत.अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १९ मे पासून सुरू करण्यात आली होती. सराव नोंदणी नंतर २१ मे पासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू होणार होती. मात्र पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खोडांबली. पुढे २६ मे पासून पुन्हा नोंदणी सुरू करण्यात आली ३ जून पर्यंत असलेली मुदत पुढे पाच जून व नंतर आठ जून पर्यंत वाढविण्यात आली अकरा व बारा जूनला महाविद्यालयीन कोटा प्रवेश घेण्यात आले १४ जून पासून सामान्य प्रवेश सुरू होणार होते मात्र शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया तब्बल दहा-बारा दिवस पुढे ढकलली. दहावीच्या निकालाला तब्बल दीड महिना लोटल्यानंतर आता कुठे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.२७ जून ते ३ जुलै पर्यंत प्रवेशाची पहिली फेरी होणार होती परत एकदा शालेय शिक्षण विभागाने यात बदल केला आहे.आता ३० जुन ला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. २जुलै पासून विद्यार्थी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश करू शकतील. ज्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही ते विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी लॉगिन मध्ये नोंद करू शकतील. या शैक्षणिक सत्रापासून संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत आहे. याआधी महापालिका क्षेत्रात इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती मात्र आता शहरी भागासह संपूर्ण ग्रामीण भागात सेंद्रिय प्रवेश समिती अंतर्गत अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही पद्धत वेळ खाऊ असून यामुळे विद्यार्थ्यांना दीड ते दोन महिन्यापर्यंत प्रवेशासाठी वाट बघावी लागत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ही वेळखाऊ किचकट गुंतागुंतीची असून ती सुलभ करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागतो, ज्यात त्यांची माहिती, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर तपशील भरावे लागतात.आवश्यक कागदपत्रे जसे की दहावीची गुणपत्रिका, जातीचा दाखला (लागू असल्यास), आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. या प्रक्रियेनंतर गुणवत्ता यादीची वाट पाहणे, आणि त्यात आपले नाव तपासणे, तसेच कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे हे पाहणे. त्यानंतर प्रवेश निश्चित होत असतो.प्रवेश निश्चित करण्यासाठी, विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे mविद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून अकरावीच्या प्रवेशाला विलंब करू नये. दहावीचा निकाल लागल्यावर शिक्षण विभागाने पूर्ण वर्षाचे वेळापत्रक बनवून प्रत्येक महाविद्यालयाला द्यावे. यामध्ये दहावीचा निकाल लागल्यानंतर या काळात प्रवेश प्रक्रिया पार पाडावयात. नंतर अभ्यासक्रमाची आखणी करावी. यात अभ्यासक्रम परीक्षा यात छोट्या व मोठ्या सुट्ट्या यामध्ये राष्ट्रीय दिन, राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या, गणेश चतुर्थी, दीपावली, क्रीडा महोत्सव कोणत्या तारखला येतात त्याप्रमाणे सुट्ट्या जाहीर करून शैक्षणिक आराखडा तयार करावा. त्याप्रमाणे अभ्यासक्रम, परीक्षा, सुट्ट्या व अन्य उपक्रम वेळच्या वेळी राबविण्यात याव्यात. ही सर्व जबाबदारी माध्यमिक विभागाची असेल. म्हणजे विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे टेन्शन येणार नाही. अकरावीपेक्षा बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी कलाटणी देणारे वर्ष असते. अकरावीच्या परीक्षा लवकर घेतल्या, तर बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळू शकतो.तिलाकॉन नगर वर्धा९५६१५९४३०६
