
भालूर (वार्ताहर) कोणत्याही गावात कर्मचाऱ्यांनी काम करताना प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने काम केल्यास गावकरी केलेल्या कामाची नक्कीच दखल घेतात असे प्रतिपादन ग्रामपंचायत अधिकारी वाय एस.निकम यांनी केले.ते निरोप समारंभावेळी बोलत होते. भालूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी वाय एस निकम यांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ भालूरकरांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.यावेळी मच्छिंद्र उशीर,बापू महाराज निकम,राजेश निकम,सुभाष कडलग, गणपत निकम, आरती सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त करताना गेली नऊ वर्ष भालूर गावासाठी साठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. त्यांच्या कार्यकाळात मागील वर्षी सुमारे ३००० हजार वृक्षांची केलेली लागवड आणि त्यांचे केलेले संगोपन, जलसंधारणची झालेली कामे तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उभारणी हि कामे त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे पूर्ण केल्याचे नागरिकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.ग्रामपंचायत अधिकारी वाय एस निकम यांनी सांगितले कि,कामाप्रती निष्ठा असेल तर त्याची नक्कीच दखल घेतली जाते. बदली झाल्यानंतर माझ्या आयुष्यात प्रथमता असा निरोप समारंभ झाला, जो मी कधीही विसरू शकत नाही. यावेळी निकम यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन सरपंच शालूबाई थेटे यांनी सत्कार केला.तर नव्याने रुजू झालेले ग्रामपंचायत अधिकारी पी.यु.बोडके यांचेही स्वागत करण्यात आले.याप्रसंगी सरपंच शालूबाई थेटे,पंचायत समितीचे माजी सदस्य श्रावण गोरे,रमेश निकम,माधव निकम,देविदास निकम, वसंत निकम,कचरू पाटील,नामदेव पाटील,दत्ता पाबळे,अनिल बरशिले,राजेंद्र मेंगळ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.सूत्रसंचालन सोमनाथ तळेकर यांनी केले.
