
शेगाव (प्रतिनिधी ) आज दिनांक २६ जून २०२५ रोजी शेगाव येथे गुरु रविदास सत्यशोधक समाज तसेच गुरु रविदास सत्यशोधक मासिकाचे वतीने रयतेचे राजे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा जयंती उत्सव श्री बालराज सावले यांचे निवास स्थानी माने नगर शेगाव येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर पांझाडे गुरुजी हे होते.कार्यक्रमात सर्वश्री एन पी काटकर साहेब,शिवहरी वानरे सर,सुधाकर वाडेकर,बी के गवई साहेब,पी एन वाडेकर साहेब व दिलीप सरकटे साहेब व इतर समाज बांधव हजर होते.कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराजाबद्दल माहिती देऊन त्यांचे कार्याचा गुणगौरव केला व महाराजांचे अपूर्ण राहिलेले काम बहुजन समाजाने करावे असे एकूण मान्यवरांचे मनोगत होते. शेवटी दिलीप सरकटे साहेब यांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.कार्यक्रमाचे संचालन दिलीप सरकटे यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन बलराज सावले यांनी केले.
