
नांदगाव-(प्रतिनिधी )मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या विद्यालयाचे विद्यार्थी हित लक्षात घेऊन , विद्यार्थ्यांना शाळेत ये – जा करण्याकरिता होणारा त्रास कमी व्हावा . बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी याकरिता नांदगाव बस स्थानकाचे वाहन निरीक्षक विनोद इप्पर साहेब यांना संस्थेचे तालुका संचालक .अमित भाऊ बोरसे पाटील यांनी निवेदन दिले. समवेत ज्येष्ठ नेते .रमेश आण्णा बोरसे, शालेय समिती अध्यक्ष . विजय काकळीज, डॉ. प्रवीण निकम, . राजेंद्र पाटील अदि उपस्थित होते. नांदगाव आगारातून न्यु इंग्लिश स्कुल मध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शलेय वेळापत्रकाप्रमाणे बसेस उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन नियंत्रक विनोद इप्पर यांनी अमितभाऊ बोरसे पाटील यांना दिले.
