.

**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४९ वा दिवस*
अनुमानातील सदोषतेविषयी पुढील गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. अनुभवाचे साधन, अनुभवाची पद्धती आणि त्या अनुभवाची पुनरावृत्ती ही सारी विशुद्ध असली तरच प्रत्यक्ष अनुभव हा प्रमाण मानता येतो. इंद्रियातील विकृतीमुळे किंवा भावविवशतेमुळे निरीक्षणात दोष उत्पन्न होतात. म्हणूनच प्रत्यक्ष अनुभव हा अनुमानाचाच एक प्रकार होय. म्हणून सगळे मानवी ज्ञान हे अनिश्चित असते आणि ते चुकीचेही असू शकते. खरा साक्षी कुणाला म्हणावयाचे? तो सांगत असलेली गोष्ट ही त्याच्या प्रत्यक्ष अनुभवास आलेली असली तरच त्याला खरा साक्षी म्हणावयाचे. ह्या न्यायाने वेद सत्य आहेत, कारण सुयोग्य वा अधिकारी व्यक्तींचा पुरावा त्यात समाविष्ट आहे. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर ६ आषाढ शके १९४७*
★ आषाढ शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २७ जून २०२५
★ १७०८ मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती धनाजी जाधव यांचा जन्मदिन
★ १८३८ सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार, लेखक, पत्रकार, ‘आनंदमठ’ कादंबरीत वंदे मातरम राष्ट्रीय गाण रचणारे कवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा जन्मदिन.
★ १८८० अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्मदिन
★ २००८ भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा स्मृतिदिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
