
लासलगाव (प्रतिनिधी ) दिनांक २६ जून रोजी सामाजिक लोकशाहीचे प्रणेते, आरक्षणाचे जनक, लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंती निमित्त येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणूनही साजरा करण्यात आला. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि सर्व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी प्रा.उज्वल शेलार यांनी आपल्या व्याख्यानातून शाहू महाराजांचे जीवनकार्य, जातीभेदाविरुद्ध लढा, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, राजर्षी शाहू महाराज यांचे समाजकारणातील योगदान व सद्य राजकीय स्थितीत महाराजांच्या विचारांची गरज विशद करत इतर कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
