
नाशिक (वार्ताहर) – हिरवांकुर फाउंडेशन नाशिक यांच्या “विद्यार्थी दशेतूनच हरितसंस्कार” द्वारा- “हर घर किसान” या संकल्पने अंतर्गत टाकाऊ वस्तूंचा वापर करून टिकाऊ वस्तू बनवण्याची कार्यशाळा जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनता विद्यालयात घेण्यात आली. बर्ड फिडर व बीज चेंडू (सिड बाॅल) बाबत हिरवांकुरचे संस्थापक अध्यक्ष निलयबाबू शाह जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना शाह म्हणाले, निसर्ग हा जैवविविधतेने नटलेला आहे. निसर्गामध्ये संतुलन राहावे, स्वच्छ, हरीत व जलयुक्त पर्यावरण मिळावे म्हणून पक्षांचे महत्त्व आहे. शहरात निर्माण होणाऱ्या काँक्रीटच्या जंगलामुळे पक्षांना दाणा, पाणी, घरटे बनवण्यासाठी वृक्ष मिळत नाही. त्यामुळे पक्षाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जैवविविधता टिकून मुलांमध्ये हरित संस्कार व्हावेत या उद्देशाने हिरवांकुरतर्फे पक्षांसाठी दाणा, पाणी यांची स्टॅन्ड, छोटी घरटी बनवण्यासाठी कार्यशाळेतून जनजागृती आवश्यक आहे. स्वच्छ हरित व जलयुक्त पर्यावरणाचे संस्कार विद्यार्थी दशेतूनच मुलांवर व्हावेत याकामी हिरवांकुरच्या ३२ टिम विविध गाव व शहरांमध्ये काम करत आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणेकामी शहरात ४० जलमंदिरांचे (शोषखड्डे) निर्माण केले आहेत. आज पर्यंत हजाराहून अधिक शाळा-महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्याचे हिरवांकुरचे पदाधिकारी प्रा. अमोल अहिरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सुतळी, झाडूच्या कामठ्या, आईस्क्रीम, कुल्फीच्या काड्या, बांगड्यांचे तुकडे, कापूस, कागद प्लास्टिकची लहान-मोठी झाकणे, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, पुठ्ठे, नारळाच्या शेंड्या, कापूस, दोर्या असे अनेक टाकाऊ साहित्य गोळा केले होते. त्यांना हिरवांकुरकडून चॉकलेटची बरणी व पिण्याच्या पाण्याची रिकामी बाटली, थाळी, नटबोल्ट, लटकवण्यासाठी दोऱ्या आदी साहित्य वाटण्यात आले. मानवासाठी जैवविविधतेचे, वृक्षाचे, पक्षांचे, महत्त्व व प्राणवायूच्या निर्मितीसाठी वृक्षाची आवश्यकता तसेच बीज चेंडूचे (सिडबाॅलचे) महत्व सेवानिवृत्त प्राचार्य अनिल खालकर यांनी सांगितले. प्रसंगी मुलांच्या विविध प्रश्नांना उत्तरे हिरवांकुरच्या विश्वस्त नलिनी शाह, मंजुषा पत्की यांनी दिलीत. बर्ड हाऊस व बर्ड फिडर निर्माणाची प्रक्रीया राखी शाह, चेतना नागरे, तनिष्का विसपुते यांनी मुलांना कृतीतून समजावून सांगितले. पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी उपस्थित ८७३ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाच-पाच बीजचेंडू व बाळरोपांची निर्मिती केली. यावेळी शालेय आवारात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रास्तविक प्राचार्य पी. के. धुळे यांनी केले, पाहुण्याचे स्वागत सत्कार एन. व्ही. बच्छाव यांनी केला. सूत्रसंचलन एस. एम. मराठे यांनी केले तर आभार बी. एम. आहेर यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्ही. बी. शेळके, एस. एस. वाघ, वाय. पी. चव्हाण, एस. के शेळके, व्ही. डी. कवडे, के. जे. पगार, व्ही. जी. पाडवी. एस. टी. हिरे, एम. आर. दाणी आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिश्रम घेतले. कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
*यशस्वी विद्यार्थी -लहान गट*प्रथम –
प्रगती चव्हाण द्वितीय – करुणा व्यवहारे तृतीय – ज्ञानेश्वरी काळेउत्तेजनार्थ -मोठा गट
प्रथम – खुशी चव्हाण द्वितीय – कोमल पवारतृतीय – अक्षदा जंगे उत्तेजनार्थ – हेमंत जोनवाल
