
जळगाव निंबायती (वार्ताहर) – विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले अमली पदार्थाविषयीची उत्सुकता व वाढत चाललेली व्यसनाधीनता त्यातूनच अनेक गैरप्रकार वाढत आहेत, पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये अमली पदार्थांनमुळे वाढलेली अपघातांची व गुन्ह्याची संख्या पाहता शालेय विद्यार्थ्यांना अशा व्यासनाविषयी जागरूकता वाढावी त्यांना व्यसनांपासून परावृत्त करणे गरजेचे आहे. ‘एक जागरूक कुटुंब, एक सुरक्षित समाज’ या घोषवाक्यानुसार व्यसनाला नाही म्हणायला शिका असे आवाहन प्रा. अमोल अहिरे यांनी केले. ते येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात आयोजित जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रसंगी प्रा. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ प्राध्यापक एस. टी. जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, प्रा. डी. एस. जमधाडे, प्रशांत देवरे, ए. व्ही. अहिरे, योगेश ठोके, सुदय बोरसे, शारीक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले तर आभार प्रा. पी. यु. शिंदे यांनी मानलेत.

