
मुळ डोंगरी (प्रतिनिधी). आज दिनांक 26 जून 2025 गुरुवार रोजी श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे शोषित, वंचित, पिडीतांचे उद्धारक सामाजिक सुधारण्याचे अग्रणी , रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी या कार्यक्रमाचे लाभलेले प्रमुख अतिथी संस्थापक अध्यक्ष श्री एस .जी. राठोड साहेब व सचिव सिद्धांत दादा राठोड व माननीय मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती बागुल आर. एम. यांनी करून त्यांच्या जीवन कार्याचा परिचय सुंदर अशा प्रसंगातून विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
