
नाशिक[ वृत्तसेवा ] मनुमानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महाविर इंटर नॅशनल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वयाच्या पन्नास वर्षा पुढील विविध क्षेत्रात जसे की सामाजिक, अध्यात्मिक , सांप्रदाईक, आरोग्य संवर्धनसेवा, पत्रकारिता, कवी लेखक संपादक इ . .इ .क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार येते. २९ जुन २०२५ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी येथील नाशिकस्थित सेवानिवृत्त प्रेस कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्कार्थी संजीव काशिनाथ आहिरे यांना कामगार सेवेसाठी जेष्ठमान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात येणार आहे . पुरस्काराचे स्वरूप शॉल , श्रीफळ, बुके, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह , व मानाचा फेटा बांधून संजीव अहिरे यांना गौरविण्यात येईल तशा आशयाचे निवडपत्र संस्थेच्या संस्थापिका मेघाताई शिंपी व इतर मान्यवरांच्या नामनिर्देश असलेले निवड पत्र प्राप्त झाले आहे. संजीव अहिरे यांना या आधीही विविध संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने कामगार व साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
