
सिन्नर,(प्रतिनिधी ) माय माता ममतेची, वंदनीय स्वर्गाहुनी. ब्रह्म लोकही ठेंगणा ,मर्त्यही खुजा तिजहूनी.* अशी वाच्छल्यशिंधू ती माता *स्वर्गीय जनाबाई कचरू मुंगसे* यांच्या *प्रथम पुण्यस्मरणानिमित्त* देवकौठे येथे *माऊली* या काव्यसंग्रहाचे प्रकाशन *मा. आ. डॉ. सुधीरजी तांबे* यांच्या हस्ते करण्यात आले.’माऊली ‘या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व राजहंस संघाचे संचालक भारत सेठ मुंगसे ,सिन्नरचे मा. नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन व फेडरेशनचे महाराष्ट्र नेते नारायण शेठ वाजे, शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिकरोडचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक बंटी शेठ भागवत , महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी प्रशांत केंदळे, विशाखा पुरस्कार प्राप्त कवी रवींद्र कांगणे ,प्रा, जावेद शेख, प्रकाशक प्रवीण जोंधळे, माऊली काव्यसंग्रहाचे कवी प्रा.राजाराम मुंगसे, शिवव्याख्याते सुदाम खालकर ढग्या डोंगर समितीचे जुगल लोया , कान्हू शेठ भुतडा, कारभारी वेल जाळी, राष्ट्रवादीचे सिन्नर तालुकाप्रमुख जयराम शिंदे,श्रीराम मुंगसे (गुरुजी), दिनकर मुंगसे, शाहीर स्वप्निल डुंबरे, किशोर महाराज खरात, हर्षद गोळे सर यांच्यासह सिन्नर व नाशिक येथील विविध कवी, साहित्यिक, प्राध्यापक, मान्यवर यांसह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला वैकुंठवासी जनाबाई कचरू मुंगसे यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक हर्षद गोळेसर यांच्या सुमधुरवाणीने माऊली काव्य संग्रहातील अभंगवाणी सादरीकरणाने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.आपल्या प्रास्ताविकात कवी प्राध्यापक राजाराम मुंगसे यांनी माऊली या काव्यसंग्रहामागील स्वतःची भूमिका सादर करून सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे व सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माऊली काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रशांत केंदळे यांनी आई वरील अनेक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशाखा पुरस्कार प्राप्त कवी रवींद्र कांगणे यांनी आई वडील व मुलींच्या बाबतीत कविता सादर करून मुलींना सावधानतेचा इशारा दिला. महाराष्ट्रातील शिवव्याख्याते सुदाम खालकर यांनी काव्यसंग्रहातील कविता सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. शिवव्याख्याते जावेद शेख, महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बंटी शेठ भागवत व सिन्नर नगरीचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी माऊली या कविता संग्रहा बद्दल मत व्यक्त करताना कवीचं कवितांविषयी असलेलं प्रेम व त्यांची भावना यांचा एकत्रित मेळ करून एक महाराष्ट्रातील उच्च प्रतीचा माऊली काव्यसंग्रह साहित्य क्षेत्रास मिळाला अशी भावना व्यक्त केली. या प्रसंगाचे औचित्य साधून ढग्या डोंगर समितीचे जुगल लोया यांनी ढग्या डोंगरावर 100पिंपळ वृक्षाच्या लागवडीचा निर्णय जाहीर केला . यावेळी प्रा . राजाराम मुंगसे यांनी ढग्या डोंगर समितीला सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. ज्यांच्या हस्ते माऊली या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले ते नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी ग्रामीण भागात देखील कसदार लेखक, कवी आहेत. फक्त त्यांना संधी मिळाली तर ते शेतीमाती ,पाणी, निसर्ग आणि आपल्या नात्यातील कविता अतिशय दर्जेदार लिहू शकतात व शासन दरबारी शेतकऱ्यांची गार्हाणी आणि समस्या मांडण्याचं समर्थपणे काम करू शकतात. अशा कविता प्राध्यापक राजाराम मुंगसे यांनी आपल्या ‘माऊली’ या काव्यसंग्रहातून लिहिलेल्याआहेत त्यांचा काव्यसंग्रह निश्चितच साहित्य क्षेत्रात भरभराटी व शासन दरबारी त्यांचे गार्हाणे नक्कीच मांडेल असा आशावाद व्यक्त केला व माऊली काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या .समारोप प्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक भारत शेठ मुंगसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काव्यसंग्रहास शुभेच्छा देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले. राजेंद्र कहांडळ यांनी सर्व ग्रामस्थ ,वारकरी संप्रदाय व साहित्यिक व सर्व नातेवाईक परिवार यांच्या वतीने वै. जनाबाई मुंगसे यांना आदरांजली वाहिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ यांनी अतिशय दर्जेदारपणे केले. कार्यक्रमासाठी सिन्नर ,नाशिक, संगमनेर येथून अनेक क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईक परिसरातील मान्यवर उपस्थित होते.सिन्नर सार्वजनिक वाचनालचे उपाध्यक्ष नरेंद्र वैद्य, प्रकाश नवसे ,बाळासाहेब भगत, दत्ता जोशी, जुगल लोया ,कारभारी वेलजाळी ,अनुपभाई गुजराती, उल्हास देशपांडे ,उद्योजक अरुण खताळे, वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख ,सोनांबे येथील मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे माजी मुख्याध्यापक शिवाजी रहाटळ, एकनाथ खैरनार, वडांगळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, प्रा. रावसाहेब गायकवाड, महाराष्ट्र माझा परिवाराचे अध्यक्ष शिवनाथ भाऊ कापडी, बापू ढिकले, शिंगवे गावचे उपसरपंच धोंडीराम आप्पा रायते ,वावीचे माजी सरपंच कानू शेठ भुतडा ,कारभारी वेलजाळी, पप्पू ठाकरे ,पत्रकार दीपक पाटील, पत्रकार भारत घोटेकर, सोमठाणे येथील वैभव अग्रोचे संचालक कैलास कोकाटे व सर्व नातेवाईक परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.—
