
वडांगळी..(प्रतिनिधी)… मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय वडांगळी या विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विनम्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे हे होते. यावेळी व्यासपीठावर अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके, शालेय समितीचे सदस्य बबनराव चव्हाणके, विक्रम माधवराव खुळे, मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, कैलास काळे, भाऊसिंग पंढुरे, बाळासाहेब अडसरे, रवींद्र हांडगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांनी केले. अध्यक्षस्थानी बोलताना सुदेश दादा खुळे म्हणाले की छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे लोक कल्याणकारी राजे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची राज्यपद्धती ही आदर्श राज्यपद्धती म्हणून ओळखली जाते. त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वधर्मसमभाव होता. प्रजाहित जोपासणारे राजे म्हणून त्यांचा नावलौकिक होता .असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव सांगळे यांनी केले आभार संदीपराव म्हस्के यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
