
नांदगाव : (मारुती जगधने) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त नांदगाव येथील न. पा. मराठी शाळा क्रमांक 10 मधील शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप तसेच 151व्या जयंती निमित्त 151 मोतीचूर लाडुचे वाटप मातोश्री वस्तलाबाई तुसे यांच्या समरणार्थ राजर्षी छत्रपती शाहू महाराज शोषल ग्रुपच्या माध्यमातून समाजसेविका अंजुम कांदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या वाटप करण्यात आले.मागील काही वर्षांमध्ये आपल्या प्राथमिक शिक्षणाची अवस्था बऱ्यापैकी सुधारली आहे. मात्र जे घटक आजही मूलभूत सुविधे पासून वंचित आहेत त्यांच्याबद्दल समाज म्हणून,आपण आणखी काही पावलं उचलणं गरजेचं असून त्या निमित्ताने या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर देऊन त्यांनी शिकावं मोठं व्हावं,संधीचे सोने करून नगरपालिकेच्या शाळेचे नाव उंचवावे असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका,समृद्धी सहकारी बँकचे चेअरमन अंजुमताई कांदे,डॉ.काजल तुसे,कवयत्री प्रतिभा खैरनार,शिवसेना शहर प्रमुख रोहिणी मोरे,राजश्री शाहू महाराज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर(नाना)जाधव,डॉ.सुनील तुसे,रिपाई महिलाआघाडी तालुकाध्यक्ष संगीता वाघ,डॉ. सौ मेधावत,मुख्याधिकारी शामकांत जाधव,प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील,कुटे,मा.नगरसेवक नितीन जाधव,जेष्ठ पत्रकार मारुती जगधने,पत्रकार प्रज्ञानंद जाधव,नाना आहिरे,रिपाई नेते देविदास मोरे,काँग्रेस नेते मनोज चोपडे,विलास कोतकर,गंभीर आहिरे,मुख्याध्यापक ठाकूर ,शिक्षक पौणिकर,मोरे ,महाले ,शिक्षिका कर्डीले,तसेच राजश्री शाहू महाराज सोशल ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत गरुड,सहसचिव सोहेल रंगरेज,दीपक मोरे,सोमनाथ चौधरी,गौतम काकळीज,किरण पवार,प्रमोद पगारे,विलास लोखंडे,जफ्फर शेख,प्रवीण गरुड,ऋषी जाधव,सलमान पठाण,शशी जाधव,आकाश पाणकर,यश शिंदे,मंगेश पगारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील प्रशासकीय अधिकारी,मान्यवर,पालक,शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गांगुर्डे यांनी केले तर आभार ठाकूर यांनी मानले.
