
नांदगाव (प्रतिनिधी):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती. काळे जे. आर.होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील उपशिक्षक श्री. कदम आर.जे.यांनी राजश्री शाहू महाराज यांचा जन्म, बालपण , अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांच्या मुलांसाठी शाळा व सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली. तसेच संस्कृत विषय शिक्षक श्री. योगेश खालकर सर यांनी संस्कृत भाषेतील अभिजात लेखक, कवी ,नाटककार महाकवी कालिदास यांचा जीवन परिचय करून दिला. अध्यक्षीय मनोगतात श्रीमती काळे मॅडम म्हणाल्या की,राजश्री शाहू महाराज हे समता शिक्षण आणि न्यायाचे महान पुरस्कर्ते होते .त्यांनी मोफत सक्तीचे शिक्षण सुरू केले. अस्पृश्यता व जातीभेद नष्ट केले.बालविवाह प्रथा बंद केल्या. शेतक ऱ्यांसाठी शेती विषयक चांगले धोरण राबवले . त्यांनी विधवा पुनर्विवाहास मान्यता दिली. त्यांच्या सामाजिक कार्याबाबत माहिती मनोगतातून व्यक्त केली. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री. अविनाश शेवाळे सर यांनी महाकवी कालिदास दिन आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी का साजरा केला जातो .याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
