
नांदगाव -(प्रतिनिधी )दि.२६ जून रोजी जागतिक आमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या विद्यालयात नांदगाव पोलीस निरीक्षक श्री भदाने साहेब यांनी विद्यार्थ्यांना अम्ल पदार्थांपासून होणारे दुष्परिणाम व अमली पदार्थांच्या आहारी न जाण्याचे आव्हान केले. Just try चे रूपांतर व्यसनामध्ये देखील होऊ शकते म्हणून या पदार्थांपासून लांब राहण्याचे आव्हान माननीय श्री भदाणे साहेबांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम व पर्यवेक्षक श्री शेवाळे सर उपस्थित होते. यानंतर जागतिक आम्ल पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रतीक म्हणून मा.श्री भदाने साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील हरित सेनेचे सहकार्य लाभले.
