
ओझर ( वार्ताहर )मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. प्रारंभी राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी केले.

याप्रसंगी राजर्षी शाहू यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी, मराठा विद्या प्रसारक संस्था उभारणीत राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. संस्कृत महाकवी कालिदास यांच्या विषयी देवयानी बाविस्कर या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम मोहन क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षक हेमंत भट यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड यांनी मानले.
